भाग्यश्रीताई आत्राम यांच्याकडून दर्गा बांधकामासाठी आर्थिक मदत

32

– महागाव (बु.) येथे होणार दर्गा बांधकाम

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी : तालुक्यातील महागाव (बु.) येथे दर्गा बांधकामासाठी माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदास्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत देण्यात आली. मोहरम निमित्त महागाव (बु.) येथे दर्गा बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी गावातील लोकांना आर्थिक अडचण भासत असल्याचे कळताच माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी आपले कार्यकर्ते नागेश करमे यांना पाठवून दर्गा बांधकामासाठी आर्थिक दिले. महागाव (बु.) येथे दर्गा बांधकामासाठी आर्थिक मदत मिळाल्याने गावकऱ्यांनी ताईंचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.