नवनियुक्त आयएएस अधिकारी वाघमारे यांचे अजय कंकडालवार यांच्यातर्फे स्वागत

33

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी : येथील नवनियुक्त उपविभागीय दंडाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर नव्याने रुजू झालेले वैभव वाघमारे (IAS) यांचे आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि. प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी अहेरी येतील कार्यालयात सदिच्छा भेट देऊन (IAS) वैभव वाघमारे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच अहेरी उपविभागातील विविध समस्यावार व विकासात्मक कामांबद्दल चर्चा कारणात आले आहे.

यावेळी माजी जि. प. सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, खमनचेरू ग्रामपंचायतचे सरपंच सौलू मडावी, मरपल्ली ग्रामपंचायतचे उपसरपंच कार्तिक तोगम, नरेश गर्गम, राकेश सडमेक, विनोद रामटेके, रवी भोयर, प्रमोद गोडसेलवार यांच्यासह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.