जेडियुच्या महाराष्ट्र सचिवपदी उमेश ऊईके तर गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी गोकुल झोडगे यांची नियुक्ती

96

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मुंबई येथील जेडियुचे राष्ट्रीय महासचिव आ. कपील पाटील यांच्या कार्यालयात महाराष्ट्र जेडियुची कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली. यामध्ये गडचिरोली येथील आदिवासी समाजाचे युवा नेतृत्व उमेश ऊईके यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली तर गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी गोकुल झोडगे यांची नियुक्ती करण्यात आली.

सदर नियुक्ती जेडियुचे राष्ट्रीय महासचिव आ. कपील पाटील यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व कामगार नेते शशांक राव यांनी केली. यावेळी महाराष्ट्रातील अन्य पदाधिकारी यांच्या सुद्धा नियुक्त्या करण्यात आल्या. यात प्रामुख्याने महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी नागपूर येथील अतुल देशमुख, महासचिवपदी लातुर येथील अजित शिंदे, राज्य उपाध्यक्ष नागपूर येथील प्रा. राजेंद्र झाडे, झाकिर सत्तार, अरविंद सावला, आजिनाथ शिंदे, कैलास गौड, संगीता पाटील, सुरेश रेवतकर, तर कोषाध्यक्षपदी मलविंदसिंग खुराणा यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तीबद्दल सर्व पदाधिकारी यांनी आ. कपील पाटील यांचे आभार व्यक्त केले असून भविष्यात जेडियुला महाराष्ट्रात राष्ट्रीय पक्ष म्हणून काम करण्यासाठी गाव पातळीवर शाखा निर्माण करण्याचे काम जोमात करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.