पूर्व विदर्भाच्या प्रवासादरम्यान भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची भेट  

223

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हा आणि महानगरच्या प्रवासादरम्यान भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. माता महाकालीचे दर्शन घेऊन या प्रवासाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संघ कार्यवाहक श्री. रवींद्रजी भागवत यांची त्यांच्या घरी भेट घेण्यात आली. तसेच VHP जिल्हा अध्यक्ष रोडमल गहलोत, अजय जयस्वाल, जागृती फाटक (मातृसंघ), वैशाली थावते (RSS), महाकाली मंदिर ट्रष्टीच्या महाकाले यांच्याशी चर्चा करण्यात आली. संघ विचार परिवारातील अनेकांनी पहिल्यांदा असं होत आहे ही भावना बोलून दाखवली. त्यानंतर केंद्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराजभैया अहिर यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. चंदनभैया चंदेल, हरीशभैया शर्मा, रेणुकाताई दुधे यांची भेट घेण्यात आली.

त्यानंतर चंद्रपूर जिल्हा ग्रामीणच्या महिलांशी संवाद झाला. यावेळी जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, विविध आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच महानगर चंद्रपूर येथील महिलांशी संवाद साधण्यात आला. यावेळी संघटनात्मक आणि महिला मोर्चाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध अभियान याबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी सदफ अन्सारी ही मुलगी गोंडवाना युनिव्हर्सिटी सायन्समध्ये गोल्डमेडीलिस्ट राष्ट्रपती यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले होते. तिचा महिला मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाच्या जेष्ठ नेत्या वनिताताई कानडे, महामंत्री अल्का आत्राम, उपाध्यक्ष वैशाली चोपडे, उपाध्यक्ष गीता कोंडेवाड, भाजपा महिला मोर्चाच्या सचिव रेखा डोळस, भाजपा सचिव विद्या देवाळकर, महानगर अध्यक्ष अंजली घोटेकर, महामंत्री वंदना आगरकठे, महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, महामंत्री सैयरा शेख, रत्नमाला भोयर, वैशाली जोशी, शुभांगी शर्मा, बंदना सिन्हा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नागपूर जिल्हा महिला आघाडी दौरा

भाजपा महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या निर्देशानुसार, पूर्व विदर्भातील संघटन महामंत्री अल्काताई आत्राम, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. वैशालीताई चोपडे, प्रदेश उपाध्यक्ष गीताताई कोडेवाड, प्रदेश सचिव रेखाताई डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा जिल्हा महिला आघाडीची बैठक भाजपा शहर कार्यालय येथे घेण्यात आली. यावेळी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या दौऱ्यादरम्यान वर्धा जिल्ह्यातील मातृसेवा संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व संघ कार्यालय येथे भेटी देण्यात आल्या.