विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (शरद पवार गट) गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गण्यारपवार यांना नियुक्तीचे पत्र दिले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडून आता शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले आहेत. यात गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार यांच्या गटात जाऊन मंत्रिपद बळकावले. अजित पवार गटातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर धर्मरावबाबा आत्राम यांच्या समर्थकाची वर्णी लावण्यात आली. त्यामुळे आता शरद पवार गटातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी अतुल गण्यारपवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे जिल्ह्यात स्वागत करण्यात येत आहे.