जिद्द व परिश्रमाने युवकांनी यशाचे शिखर गाठावे : आमदार कृष्णाजी गजबे

46

– प्राविण्यप्राप्त विद्यार्थी व पालकांचा सत्कार सोहळा

विदर्भ क्रांती न्यूज

देसाईगंज, १५ जुलै : देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने सुसंस्कृत बनून आपल्या शाळेचा नावलौकिक केला पाहिजे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करावा. कितीही कठीण प्रसंग आले तरी जिद्द व परिश्रमाने युवकांनी यशाचे शिखर गाठावे, असे आवाहन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी केले.

येथील आदर्श हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात मागील शैक्षणिक सत्रात प्राविण्यप्राप्त करणारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा आज १५ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोतीलाल कुकरेजा तर प्रमुख मार्गदर्शक तथा विशेष अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. परशुराम खुणे उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नुतन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष केवळराव घोरमोडे, उपाध्यक्ष जगदीश शर्मा, मुरलीधर दुपारे, ओमप्रकाश अग्रवाल, साधना सपाटे, अ. जहीर अ. हमीद शेख, संतुमल डोडाणी, अतुल उईके, डॉ. इंदरप्रीतसिंग तुटेजा, योगेश नाकतोडे, प्राचार्य शंकर कुकरेजा, मुख्याध्यापक डी. डी. शिंगाडे, दादाजी भर्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.