पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस गडचिरोली येथे स्वच्छता पंधरवाडा अभियान

42

– हिंदुस्तान पेट्रोलियमच्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 15 जुलै : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने हिंदुस्थान पेट्रोलियमच्या 49 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता पंधरवाडा अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियाना अंतर्गत आज, 15 जुलै रोजी मे. पिपरे पेट्रोलियम सर्व्हिस गडचिरोली येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले व पेट्रोलपंप परिसरात स्वच्छता करण्यात आली.

देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा संदेश दिलेला आहे. याच अभियाना अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानाचे औचित्य साधून पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस गडचिरोली येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी पिपरे पेट्रोलियमचे मालक प्रमोदजी पिपरे, संचालक अनुराग पिपरे, व्यवस्थापक प्रभाकर वाघाडे, प्रभाकर खोब्रागडे व पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी पेट्रोलपंप परिसरात स्वच्छता केली व नागरिकांना स्वच्छता अभियानाचा संदेश दिला. यावेळी पेट्रोल पंपावरील ग्राहक व नागरिक उपस्थित होते.