माजी आमदार हरिराम वरखडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

31

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोलीराज्य जंगल कामगार सहकारी संघाचे उपाध्यक्ष माजी आमदार हरिराम वरखडे यांचा 80 वा वाढदिवस देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील तिरुपती विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त जिल्हा जंगल कामगार सहकारी संघ व जिल्हा संघाशी संलग्न संस्थांच्या वतीने माजी आमदार हरिराम वरखडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा संघाचे अध्यक्ष पूर्णचंद्रराव रायसिडाम, जिल्हा संघाचे संचालक मंडळ, जोगीसाखारा संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम, जिल्हा जंगल कामगार सहकारी संघाचे सचिव प्रकाश झाडे, कार्यालयीन पर्यवेक्षक रमेश उसेंडी, पर्यवेक्षक रवींद्र वालको प्रभारी पर्यवेक्षक डी. एम. सुरपाम, विक्रम चुंगळे, झेड. एस. बोटरे, कालिदास हलामी, चंद्रकांत पिपरे, रवींद्र भुरसे, भास्कर वालको, वाय. आर. नेवारे आदी उपस्थित होते.