नगरसेवक नितीन वायलालवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

40

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 14 जुलै : चामोर्शी येथील नगर पंचातीचे गटनेते तथा नगरसेवक नितीन वायलालवार यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. चामोर्शी येथील आष्टी – मूल टी पोईंट जवळील गौरी कृषी केंद्रात गुरुवारला नित्यनेमाने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादाचा लाभ परिसरातील दुकान लाईनचे, ट्रक्टर, ट्रक मजूर व बाजारासाठी येणारे नागरिक व वाटसरू अशा शेकडो नागरिकांनी घेतला.

यावेळी चामोर्शी नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा जयश्री वायलालवार, उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे, बांधकाम सभापती वैभव भिवापुरे, माजी सभापती विजय शांतलवार, यशवंत त्रिकांडे, पंकज वायलालवार, केशव आंबटवार, शासकीय कंत्राटदार महेश मारकवार, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकेश शांतलवार, बादल डे, सतीश पुटावार, नितीन कोत्तावार, विलास सरपे, दिलीप घोगरे,प्रदीप वानखेडे, दिनेश येलेवार, सुकेन डे, निशिकांत बापुलवार जितेंद्र पाल, गौरी कृषी केंद्राचे कर्मचारी व मित्रपरिवार उपस्थित होते.