राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी लिलाधर भरडकर यांची नियुक्ती

33

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी लिलाधर भरडकर यांची नियुक्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी १२ जुलैला नियुक्तीपत्र देऊन केली. सदर नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर हे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रातून केली आहे.

निवडीचे श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, खासदार प्रफुल भाई पटेल, राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, युवा नेते ऋतुराज हलगेकर, माजी जिल्हा परिषद सभापती नाना नाकाडे, जेष्ठ नेते युनूस शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते प्रा. रिकु पापडकर, माजी युवक जिल्हाध्यक्ष श्रीनिवास गोडसेलवार यांना दिले आहे. निवडीबद्दल जिल्हातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सदर नियुक्तीपत्र मुबई येथिल राज्यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते देवगिरी या निवासस्थानी देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर हे उपस्थित होते.