आजच्या काळात सोशल मीडियाची गरज : खा. अशोकजी नेते

15

– भाजपाच्या सोशल मीडियाची बैठक संपन्न

गडचिरोली : सोशल मीडिया एक विशाल नेटवर्क आहे. या नेटवर्कला ऍक्टिव्ह करण्यासाठी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि बरेच काही सोशल मीडिया ऍक्टिव्ह केली जाते. आजच्या काळात सोशल मीडिया ही कमी वेळात कामाच्या व्यत्यामुळे घरबसल्या सर्व घडामोडींच्या बातम्या या सोशल मीडियाद्वारेे ऑनलाइनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सोशल मीडिया हे एक साधन म्हणून काम करते. होणारे कार्यक्रम व झालेले कार्यक्रम हे मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रकाशित झाली पाहिजे. आजच्या काळात सोशल मीडियाची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी केले. मोदी @ 9 महा- जनसंपर्क अभियान अंतर्गत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील सोशल मीडिया इनफलुएंसर समिट बैठक पत्रकार भवन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीचे उद्घाटक म्हणून मीडिया प्रमुखांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ९ वर्षाच्या कार्यकाळातील कामे जनतेपर्यंत पोहचविण्याकरीत सोशल मीडिया प्रमुखांची आवश्यकता असते. यासाठी सोशल मीडियाची बैठक आयोजीत करण्यात आली. या बैठकीत पुढे बोलताना खा. नेते म्हणाले, व्हाट्सअपद्वारे जर कोणी व्यक्ती आपल्या शासनाच्या विरोधामध्ये कॉमेंट जर केला तर त्या कमेंटसला उत्तर देण्याचं काम सोशल मीडियाने केलं पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक योजना हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सोशल मीडियाद्वारे केला पाहिजे‌. आज या देशामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत त्या घडामोडीचा मीडियाच्या माध्यमातून प्रसार केला पाहिजे. आर्थिक अर्थव्यवस्थेमध्ये आपला भारत देश हा अकराव्या स्थानी होता. आता पाचव्यास्थानी प्रगतीपथावर आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या देशाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. मागील नववर्षांमध्येे त्यांनी अनेक योजना अंमलात आणुन तळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचवित, लोकाभिमुख कार्य केले. असेही खासदार अशोकजी नेते यांनी सांगितले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने आमदार डॉ. देवरावजी होळी, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, भाजपा सोशल मीडियाचे प्रदेश संयोजक प्रकाशजी गाडे, सहसंयोजक लक्की चावला, प्रदेश सदस्या तथा चंद्रपूर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अल्काताई आत्राम, प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस, माजी जि. प. सदस्या तथा तालुकाध्यक्षा धानोरा लताताई पुन्घाटी, सोशल मिडिया प्रमुख तथा कार्यक्रमाचे आयोजक आनंद खजांजी, खासदार महोदयांचे सोशल मिडिया प्रमुख दिवाकर गेडाम, मीडिया प्रमुख रमेश अधिकारी तसेच मोठ्या संख्येने लोकसभा क्षेत्रातील मीडिया युवक, युवतीवर्ग उपस्थित होते.