राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी रविंद्र वासेकर यांची नियुक्ती

49

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी रविन्द्र वासेकर याची नियुक्ती केली आहे. या निवडीचे श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार हरिराम वरखडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, माजी जिल्हा परिषद सभापती नाना नाकाडे, जेष्ठ नेते युनूस शेख यांना दिले आहे. सदर नियुक्तीपत्र मुंबई येथील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला प्रदेशाध्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर व युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले. या निवडीबद्दल जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरून वासेकर यांचे अभिनंदन होत आहे.