अधिस्वीकृती समितीच्या सदस्यपदी अविनाश भांडेकर

37

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 13 जुलै : राज्य शासनाने नागपूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या सदस्यपदी जेष्ठ पत्रकार अविनाश भांडेकर यांची नियुक्ती केली आहे. प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती नियम २००७ (वितरण व नियंत्रण) शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले. सदर नियमावलीनुसार राज्यातील प्रसारमाध्यमांशी संबंधित पात्र व्यक्तींना अधिस्वीकृती पत्रे देण्याकरीता राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृती समिती गठीत करण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार समितीमधील सदस्यांची पात्रता व अनुभव लक्षात घेऊन नागपूर विभागीय अधिस्वीकृती समितीवर दैनिक पुण्यनगरीचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल पत्रकार मित्रांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.