काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मोफत पुस्तक वाटप व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम

27

– स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १३ जुलै : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तक वाटप व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उद्या, 14 जुलै रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक आरमोरी मार्गावरील संस्कृती सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टीवार लाभणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतजी पुरके तर सत्कारमूर्ती म्हणून आमदार अभिजितजी वंजारी, आमदार सुधाकरजी अडबाले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात मोफत पुस्तक वाटप करण्यात येणार असल्याने स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. नोंदणीकृत विद्यार्थ्यांना कार्यक्रमस्थळी उपस्थित असल्यावरच पुस्तक मिळणार आहेत. विद्यार्थी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून येताना आधारकार्ड व 12 वी उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका झेराक्स सोबत आणणे आवश्यक आहे. सदर कार्यक्रमास काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक डॉ. नामदेव किरसान मित्रपरिवार व काँग्रेस कार्यकर्ता गणतर्फे करण्यात आले आहे.