राणी दुर्गावती कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायकलचे वितरण

42

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 8 जुलै : मानव विकास मिशन योजनेतून वितरित करण्यात येणार्‍या सायकलींचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राणी दुर्गावती कन्या विद्यालय गडचिरोलीच्या विद्यार्थिनींना आज, 8 जुलै रोजी गडचिरोली येथील एमआयडीसी परिसरात आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात करण्यात आले.
राज्य शासनाच्या वतीने आज ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, कॅबिनेट मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम, खा. अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आ. कृष्णाजी गजबे, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, जिल्हाधिकारी संजय मिना तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
राणी दुर्गावती कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी दिप्ती मारूती नागरे हिला मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात सायकलची चावी प्रदान करण्यात आली. यावेळी तिला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राणी दुर्गावती कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोलीच्या प्राचार्या वैशाली मडावी, प्रा. देवानंद कामडी प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायकलीचा लाभ मिळालेल्या विद्यार्थिनींचे संस्थाध्यक्ष आदिवासी सेवक घनश्याम मडावी यांनी अभिनंदन केले.