खा. अशोकजी नेते व आ. रामदासजी आंबटकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात चादर, शेगडी, फळ वाटप, वृक्षारोपण

60

– महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस रेखताई डोळस यांचा पुढाकार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 2 जुलै 2023 : जनसामान्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्य करणारे गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते व विधान परिषदेचे सदस्य आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भाजपा महिला आघाडीच्या चिटणीस सौ. रेखाताई डोळस यांच्या हस्ते चादर, शेगडी, फळ वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. साळुंखे, जिल्हयाचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते  यावेळी समाजकल्याण सभापती सौ. रंजिताताई कोडापे, सौ. योगिताताई पिपरे, पल्लवी बारापात्रे, रेखा ढवळे, भूमी भरडे, सौ. वैष्णवीताई नैताम, सौ. लताताई लाटकर, कोमल ताई बारसागडे, शिल्पा भोयर, भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांच्यासह भाजपा महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.