कोटगल टी पॉईंट ते कोर्ट टी पॉईंट मार्ग 5 जुलैला राहणार रहदारीसाठी बंद

46
– महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, 2 जुलै २०२३ : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की, बुधवार, 5 जुलै 2023 रोजी महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा गडचिरोली दौरा नियोजित आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहतुकीसाठी कोटगल टी पॉईंट ते कोर्ट टी पॉईंट दरम्यानचा मार्ग 5 जुलै रोजी सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी बंद राहणार आहे. याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी व कोणीही या मार्गाचा वापर करु नये. महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणा­ऱ्या गोंडवाना विद्यापीठातील कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनाच्या पार्किंगची सोय टी पॉईंट येथील खुल्या मैदानात केली असून अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या (व्हि.व्हि.आय.पी.) वाहनांची सोय मृदा संवर्धन कार्यालय या ठिकाणी केलेली आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.