आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

28

विदर्भ क्रांती न्यूज

आरमोरी : आरमोरी विधानसभा मतदारसंघातील विकासाला गती मिळावी व ग्रामस्थांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आमदार कृष्णाजी गजबे यांच्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान आमदार कृष्णाजी गजबे यांनी गुरुवारला दवंडी येथे ग्रामस्थांची भेट घेतली. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अंदाजित किंमत 1246.8 लक्ष रुपयांच्या दवंडी-भाकरोंडी-खांबाला-मुस्का रस्ता बांधकामाचे भूमिपुजन केले व काम लवकर सुरू करण्याचे निर्देश संबधित कत्राटदाराला दिले.
यावेळी आमदार कृष्णाजी गजबे म्हणाले की, रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यास ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. यामुळे त्यांना ये-जा करणे सोयीचे होईल आणि वेळेची बचत होईल. त्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यात होणाऱ्या त्रासातूनही दिलासा मिळणार असल्याचे आमदार आमदार गजबे यांनी सांगितले. त्याचबरोबर काही ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याचीही माहिती मिळत असून, लवकरच रहिवाशांची ही समस्या दूर होणार आहे.
याप्रंसगी माजी जि. प. सदस्य लताताई पुंनगाटे, माजी सभापती बग्गुजी ताडाम, सोशल मीडिया सहसंयोजक ओमकार मडावी, भाईचंद गुरनूले, रामहरी चोधरी, जयदेव पा किरंगे, ऋषी कुमरे, सिगुजी ताडाम, रावण पदा, दादाजी किरगे तसेच परिसरातील प्रतिष्ठित व गावचे नागरिक उपस्थित होते.