भाजपच्या वतीने रामनगर येथील बुथावर घर घर चलो महा जनसंपर्क अभियान

30

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २९ जून २०२३ : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली शहरातील रामनगर वार्ड शक्ती केंद्रातील बुथ क्र. 85 येथे भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात घर घर चलो महाजनसंपर्क अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी रामनगर वार्डातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना केंद्रातील मोदी सरकारने 9 वर्षाच्या कालावधीत केलेली चांगली लोकोपयोगी कामे व विविध योजनांची माहिती दिली. तसेच शासनाच्या घरकुल, शौचालय, गरीब कल्याण तसेच किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांना पंतप्रधान मोदी सरकारच्या चांगल्या कार्याची व विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी लाभार्थी महिलांनी व नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानले.

याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री तथा शक्ती केंद्र प्रमुख वर्षाताई शेडमाके, शहर अध्यक्ष तथा बुथ प्रमुख कविताताई उरकुडे, भाजप विमुक्त भटक्या जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश मांडवगडे, बुथ प्रमुख संजय मांडवगडे, सलीम शेख, स्वप्नील कोसरे उपस्थित होते.