‘संपर्क से समर्थन अभियान’ अंतर्गत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याशी जुडावे : खा. अशोकजी नेते

44

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 28 जून 2023 : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी सन 2014 पासून गरीब कल्याणाकरिता अविरत कार्यरत आहेत. भष्टाचारमुक्त कार्यपध्दतीने अंत्योदयाकरिता सेवा देत आहेत. जगभरात देशाचा गौरव वाढविलेला आहे. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ‘संपर्क से समर्थन अभियान’ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने 9090902024 या क्रमांकावर मिस्ड कॉल देउन नरेंद्रजी मोदींच्या सोबत जुड़ता येणार आहे. आपण आपल्या कुटुंबातील सदस्य, शेजारी तथा मित्रमंडळीला देखील वरील क्रमांकावर मिस्ड कॉल देण्यास सांगु शकता. त्यानुसार आपल्या मोबाईलवर आलेल्या gyearsofseva.bjp.org लिंकवर माहिती भरून पाठवावी. त्यानुसार आपण नरेंद्रजी मोदीजी सोबत जोडले जाणार आहात तथा मोबाईलवर शासनाच्या योजनांची व विविध क्षेत्राची माहिती मिळत राहील. करीता आपण कुटुंबातील व मोबाईल धारक सर्व सदस्यांना शेजाऱ्यांना व मित्रमंडळींना सुध्दा नरेंद्र मोदीजी सोबत जुडण्याकरिता प्रोत्साहीत करावे, असे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.