खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते चांदली व खेडी येथे विकासकामांचे भूमिपुजन

71

विदर्भ क्रांती न्यूज

सावली, 28 जून 2023 : खासदार अशोकजी नेते यांच्या विशेष प्रयत्नातून जनसुविधा अंतर्गत 2.60 (दोन कोटी साठ लक्ष रुपये) सावली तालुक्यात मंजूर झाल्याने त्या विकास कामाचे भूमिपूजन खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते आज, २८ जून २०२३ ला चांदली व खेडी या ठिकाणी कुदळ मारून करण्यात आले.

यावेळी खासदार तधा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतिश बोम्मावार, सावलीचे बीडीओ वासनिक, सहाय्यक बीडिओ तेलकापलीवार, विस्तार अधिकारी परसावार, शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद धोटे, कृ. उ. बा. समिती संचालक तथा भाजपा युवा नेते सचिन सा. तंगडपल्लीवार, चांदलीचे सरपंच विठ्ठल येगावार, खेडीचे सरपंच सचिन ताटपलीवार, भाजपा शाखा अध्यक्ष चांदली अनिल येनगंटीवार, अनिल माचेवार, मयुर गुरूनुले, उपसरपंच मनीषा मोहुरले, जयश्री जनमवार, गोपिका गोपेवार, शुभांगी संतोषवार तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावकरी नागरिक उपस्थित होते.