आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत “मेरा बूथ सबसे मजबूत” कार्यक्रमाचे आयोजन

37

– पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी साधला बूथ कार्यकर्त्यांशी संवाद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 28 जून 2023 : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी “मेरा बूथ सबसे मजबूत” या कार्यक्रमांतर्गत बूथ कार्यकर्त्यांशी व भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आपल्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये प्रोजेक्टरद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन केले.

याप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, तालुका उपाध्यक्ष जयराम चलाख, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, युमो तालुका महामंत्री लोमेश सातपुते, किशोर गटकोजवार, नीरज रामानुजमवार, संजय चलाख, युमो तालुका महामंत्री दीपक वासेकर, उपसरपंच काशिनाथ बुरांडे, उपसरपंच शेषराव कोहळे, रामचंद्र वरवाडे, रतण मल्लिक, प्रकाशजी सातपुते, साई गव्हारे, बलराम बक्षी, सुमित सरकार, दिलीप नैताम, डोमदेव वन्नेवार, पुरुषोत्तम बावणे, सुरेश जेंगठे तथा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.