नऊ वर्षातील केंद्रशासनाच्या प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोहोचवा : खासदार अशोक नेते

51

– मोदी @९ महा- जनसंपर्क अभियानांतर्गत गडचिरोची लोकसभा मतदारसंघातील अहेरी विधानसभेत “जेष्ठ कार्यकर्ता संमेलन” संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी, १७ जून : मोदी @ ९ महा- जनसंपर्क अभियांना अंतर्गत गडचिरोची लोकसभा मतदारसंघातील अहेरी विधानसभेत जेष्ठ कार्यकर्ता संमेलन कार्यक्रम गडचिरोची – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अहेरी माता कन्यका मंदिर येथे संपन्न झाला.

 

यावेळी प्रामुख्याने मंचावर विलास गुड्डेल्लीवार, मधुकरराव नामेवार, प्रकाश गुड्डेल्लीवार, अहेरीचे तालुकाध्यक्ष रविंद्र नेलकुद्री, मुलचेराचे तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, भामरागडचे तालुकाध्यक्ष दशरथ आत्राम, महिला मोर्चाच्या जेष्ठ नेत्या रहिमा सिद्धीकी, भाजपा जिल्हा सचिव बादल शहा, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गणपती, सुनिल बिशवास, मोहन मदने उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थिताना खासदार अशोकजी नेते यांनी अध्यक्षीय स्थानावरून मार्गदर्शनपर बोलतांना देशाचे लाडके विश्वगौरव पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली. या नऊ वर्षाच्या कार्यकाळात अनेक शासकीय योजना सामान्य तळागाळापर्यंतच्या लोकांना योजनांची माहिती व्हावी, जेणेकरुन त्याचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेऊन त्याचा प्रसार व प्रचार करावा असे केल्यास एकही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही.केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देत, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कणा आहे. ज्येष्ठ भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते हेच नवीन भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मार्गदर्शक आहेत व त्यांच्याच पुढाकाराने आपला पक्ष उभा आहे त्यामुळे पक्ष कार्य करतांना त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे असे प्रतिपादन अध्यक्षीय स्थानावरून ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलनाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

जेष्ठ कार्यकर्ता संमेलनाप्रसंगी सत्कार करण्यात आलेले अहेरी विधानसभेतील जेष्ठ कार्यकर्त्याचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. त्यावेळी विलास गुड्डेल्लीवार, मधुकर नामेवार, महादेव निकोडे, शंकर मडावी, क्रिष्णा मंचालवार, अशोक नालमवार, अशोक निकुरे, देविदास येनुरवार, उमेश गुप्ता, प्रशांत पत्तीवार, मुलचेरा -प्रबोध राय, मधुकर दास, विशंबर दास, गजानन येलमुले, जिवन सरकार, भुवन मुजुमदार,अखिल डे, तारापद मंडल, शैलेश घरामी, अनिल हलदार, भामरागड – सखाराम भिकारु भांडेकर, एटापल्ली- मधूसुधन कंकनालवार, शंकरयाजी पुलूरवार, झुरू गोविंदा आलामी, मल्ला गावडे, पैजु गावडे अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलनाप्रसंगी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक अमोल गुड़्डेलीवार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.