आमदार डॉ. देवरावजी होळी टिंगुसले परिवारातील ३ अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

25

– लालडोंगरी (चामोर्शी) येथील स्व. राजू टिंगुसले यांच्या मुलांचे आपल्या आजीकडे वास्तव्य

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : लालडोंगरी,चामोर्शी येथील राजु टिंगुसले यांचे निधन झाल्यानंतर त्यांची गौरव टिंगुसले वय १२ वर्ष कु.मयुरी टिंगुसले वय १५ वर्ष, कु. महिमा टिंगुसले ८ वर्ष ही तिन्ही मुले अनाथ झाल्याने त्यांची वयोवृद्ध आजी (विमल भोयर) त्यांचे पालन पोषण करीत आहे. मात्र त्या आजीचीही परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे त्यांना या तिन्ही मुलांचा खर्च व त्यांच्या शिक्षणाचा खर्च करणे शक्य होत नसल्याची बाब आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या निदर्शनास येतास त्यांनी तत्काळ या कुटुंबाची भेट घेतली. या तिन्ही मुलांची जबाबदारी घेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च आपण उचलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी चामोर्शी तालुक्याचे भाजपा अध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा, ज्येष्ठ नेते जयराम चलाख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.