खा. अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा तालुका सावली बुथ सशक्तिकरण अभियान आढावा बैठक

18

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : बूथ सशक्तिकरण अभियान आढाव्याच्या संदर्भात आज सावली तालुक्याची संगठनात्मक बैठक क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकभाऊ नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याहाड (खुर्द) येथील जे. के. महाविद्यालयात पार पडली. या बैठकीला अध्यक्षस्थानी उपस्थित होतो.
बैठकीच्या सुरवातीलाचं क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. जिल्हा संगठन महामंत्री संजय गजपुरे यांनी उपस्थितांना बुथ सशक्तिकरण अभियानाच्या संदर्भात प्रस्तावनापर माहिती दिली. त्यानंतर तालुका पातळीवर सुरू असलेल्या बूथ रचनेचा मी आढावा घेतला.
तालुक्याची उर्वरित बुथ रचना लवकरात लवकर पुर्ण करणे, सामाजिक न्याय सप्ताह राबविणे, सरल ॲप प्रशिक्षण, धन्यवाद मोदीजी पत्रे, फ्रेंड ऑफ बीजेपी अशा विविध संगटनात्मक विषयांवर पदाधिकारी-कार्यकर्त्यांना विस्तृत मार्गदर्शन केले.
यासोबतच, बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वांनी लक्ष घालावे आणि दि. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या शंभराव्या मन की बात कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करण्यासंदर्भात सर्वांनी बुथनिहाय नियोजन करावे अशी सुचनाही बैठकीदरम्यान केली.
त्यानंतर, खासदार अशोकभाऊ नेते यांनीही उर्वरित बुथ रचना व अन्य संगटनात्मक कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन केले.
प्रसंगीच, जिल्हा आयटी प्रमुख निखिल देशमुख यांनी सरल ॲप व फ्रेंड्स ऑफ बीजेपी च्या संदर्भात उपस्थितांना तांत्रिकदृष्ट्या माहीती दिली.

या बैठकीला जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कु. अल्काताई आत्राम, तालुकाध्यक्ष अविनाश पाल, महामंत्री सतीश बोम्मावार, महामंत्री संतोष तंगडपल्लीवार, प्रकाश पा. गड्डमवार, अर्जुन भोयर, गणपत कोठारे, निखिल सुरमवार, विनोद गड्डमवार, शरद सोणवाणे, अरुण पाल, कविंद्र रोहणकर, श्रीमती पुष्पाताई शेरकी, माजी जि. प. सदस्या सौ. योगीताताई डबले, सौ. मनिषाताई चिमुरकर, सौ. प्रतिभाताई बोबाटे, सौ. निलिमाताई सुरमवार, सौ. शोभाताई बाबणवाडे, राहुल लोडेल्लीवार, दिलीप जाधव, सौ. छायाताई चकबंडलवार, मोतीराम चिमूरकर, राकेश गोलेपेल्लीवार, विशाल करंडे, तुळशीदास भुरसे, दिवाकर गेडाम आदिंसह आजी-माजी लोकप्रतिनिधी, तालुक्यातून अल्पकालीन शक्ति केंद्र विस्तारक, प्रमुख, बुथ प्रमुख तसेच तालुक्यातील कार्यकर्त्यांची उपस्थित होती.