जिल्ह्यातील विजेची समस्या सोडविण्याकरिता खासदार श्री. अशोकजी नेते यांनी तातडीने बोलाविली विद्युत समितीची बैठक

41

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा क्षेत्रात आकस्मिकपणे विज पुरवठा खंडित झाल्यामुळे व लोडसेडिंग लागल्यामुळे काही गावांमध्ये तिन ३ दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांनी कोरची,येथे चक्काजाम आंदोलन सुरू केले. ही सदर बाब खासदार अशोकजी नेते यांच्या निदर्शनास येताच यासंबंधी दाखल घेत तातडीने जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे दिनांक ११ एप्रिल २०२३ ला बैठक बोलावून समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्युत अधिकाऱ्यांना निर्देश देऊन बैठक घेण्यात आली

कोरची क्षेत्रात विजेच्या संदर्भामध्ये लोडशेडिंगच्या विरोधात चक्काजाम आंदोलन सुरू असल्याने जनतेच्या सोयीसुविधेकरिता खासदार अशोकजी नेते यांनी या तातडीच्या बैठकीत अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकिला विद्युत संबंधित उपकेंद मधुन निघणारे ११ के.व्ही. फिडर हे मिक्स पद्धतीचे आहेत ( कृषी पम्प आणि गावठान फिडर) त्यातील कृषी पंप फिडर (कृषि वाहीनी) वेगळे करण्यात यावे, जेणेकरून गावातिल किंवा शहरातील लोकांना वारवार विज खंडीत होण्याचा त्रास होणार नाही. शेतीला सुध्दा योग्य दाबाचा विद्युत पुरवठा मिळेल.संपुर्ण गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व अतीसंवेदनशिल आहे. त्यात लोड कमी असल्यामुळे उपकेंद्राची संख्या सुध्दा कमी आहे जिल्हयाचे क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे विद्युत वाहीन्यांची लांबी जास्त आहे त्यामुळे त्यावारवार वाहीन्यांवर बिघाड होत असतात करीता जास्तिक जास्त ३३के.व्ही उपकेंद्र तयार करण्याबाबत प्रयत्न करण्यात यावे.गडचिरोली जिल्हा हे जंगलयुक्त मुभाग असल्यामुळे जास्तित जास्त विद्युत वाहीन्या जंगलातुन गेलेल्या आहेत. त्यामुळे वारंवार विद्युत प्रवाह खंडीत होते. जंगल परिसरातुन गेलेल्या विद्युत वाहीन्या कोटेड कंडक्टर वापरून टाकण्यात यावे, जेणे करून वारंवार विज पुरवठा खंडित होणार नाही जंगली श्रापदाची शिकार होणार नाही. कंपणीचा सुध्दा लॉस टाळता येईल.
जिल्हा मुख्यालयात विद्युत वाहीन्या एच.टी (११ के. व्ही.) आणि एल टी वायरींग से अंडरग्राऊंड पध्दतीने करणे(कीत्येक जुन्या घराचे बांधकाम हे रस्त्याच्या कडेला असल्यामुळे त्याचे घरावरून विद्युत वाहीन्या गेलेल्या आहेत) गडचिरोली शहराची वाढती लोकसंख्या आणि नव नविन तयार होणाऱ्या वस्त्या पाहता भविष्याच्या दृष्टीने आरमोरी रोडवर ३३ के.व्ही
उपकेंद्र उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात यावा नविन विद्युत जोडणी करीता सिंगल फेज गाणि थि फेज मिटर उपलब्ध नाहीत. ग्राहकांनाच नविन मिटर बाजारातून विकत घ्यायला लावले जात आहे. ग्राहकांना मिटर त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे.अशा सुचना खासदार महोदयांनी संबंधित विद्युत अधिकाऱ्यांना दिले.

याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, जिल्हाधिकारी संजयजी मिना,अधिक्षक अभियंता कोलते, कार्यकारी अभियंता हेडाऊ, कार्यकारी अभियंता डोंगरवार, उप. कार्यकारी अभियंता पोद्दार, उप. कार्यकारी अभियंता बुरकर, उप.कार्यकारी अभियंता खोब्रागडे मॅडम,अतिरिक्त कार्यकारी अभियंता कुंभरे, तसेच विद्युत अधिकारीवर्ग उपस्थित होते.