खा. अशोकजी नेते यांनी रायपूर (कारवाफा) येथे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आईच्या अत्यंविधीला उपस्थित राहून कृतज्ञता व्यक्त करत वाहिली श्रध्दांजली

37

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी आमदार डॉ. देवराव होळी यांची भेट घेत दु:ख सावरण्याचा धिर देऊन अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कृतज्ञता व्यक्त करत सांत्वन केले.
यावेळी आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, प्रदेश सरचिटणीस एस. टी. मोर्चाचे प्रकाश गेडाम, तसेच भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते व प्रतिष्ठित सन्माननीय मोठ्या संख्येने अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार महोदयांनी देव त्यांच्या आत्म्यास चिर शांती देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.