सामाजिक समरसता अभियानांतर्गत अहेरी येथील कर्तबगार महिलांचा सन्मान

60

– भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने उपक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात सामाजिक समरसता अभियान अंतर्गत अहेरी येथील 3 कर्तृत्ववान महिलांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आरोग्य सेवेत उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे कार्यरत अधिपरिचारिका रोशनी दुर्गे, परिसेविका सुनंदा रमेश चांदेकर, तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत मेघना बंड या कर्तबगार महिलांचा भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष सौ योगीताताई पिपरे यांच्या हस्ते व महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वनिताताई कानडे, ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी महिला आघाडीच्या गडचिरोली शहर अध्यक्षा कविता उरकुडे, भाजपच्या अहेरी तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्ली, अहेरी नगर पंचायतीच्या नगरसेविका शालिनी पोहनेकर, नगरसेविका लक्ष्मी मद्दीवार, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मालूताई तोडसाम, माजी तालुका अध्यक्ष किरण भांदककार, अरुणा गेडाम, अनिता मडावी, ममता उईके, गडचिरोली शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, शहर सचिव पूनम हेमके व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना शिक्षिका मेघना बंड म्हणाला 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांसाठी अनेक योजना अंमलात आणल्या. 8 कोटी महिलांना मोफत गॅस सिलेंडर देऊन त्यांची चुलीच्या धुरापासून मुक्तता केली. तसेच अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या. तसेच शेतकऱ्यांना किसान सन्मान योजने अंतर्गत वर्षाचे 6 हजार रुपये देण्यात येत आहेत एकूणच पंतप्रधान मोदीजींचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.