बजरंग दलाच्या वतीने इंदिरा गांधी चौकात रामनवमी उत्साहात साजरी

56

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : बजरंग दल गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते भगवान श्रीराम यांच्या प्रतिमेची विधिवत पुजा व माल्यार्पण करून रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा सचिव अनिल पोहनकर, बी फॅशन प्लाझा चे संचालक मनोज देवकुले, व्यापारी असोसिएशनचे गुरुदेव हरडे, बजरंग दलाचे नितेश खडसे, श्रीकांत पतरंगे, राठी, विलास नैताम, युवा मोर्चाचे मंगेश रणदिवे उपस्थित होते.