हनुमान जन्मोत्सव निमित्त हनुमान टेकडी येथे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी घेतले बजरंग बलीचे दर्शन

47

– राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी : येथील प्रसिद्ध टेकडी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव निमित गुुुरुवारी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी बजरंग बलीचे विधिवत पूजन, आरती करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी टेकडी हनुमान मंदिर जन्मोत्सव समिती अहेरीद्वारे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोजनस्थळी भेट देऊन भक्तांना राजे साहेबांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. राजेंनी ह्यावेळी अनेक भक्तांशी आस्थेने संवाद साधला.

यावेळी प्रविणराव बाबा, संतोष मद्दीवार भाजपा तालुका महामंत्री, पोशालू चुधरी भाजपा तालुका महामंत्री, विनोद जिल्लेवार, विकास तोडसाम, अक्षय संतोषवार, सारंग रामगिरी, सचिन येरोजवार, अनुराग पिपरे उपस्थित होते.