भाजयुमोतर्फे आज गांगलवाडी येथे भव्य रक्तदान शिबिर

87

– युवकांनी रक्तदानासाठी सदैव तत्पर असावे : प्रा. अतुलजी देशकर

विदर्भ क्रांती न्यूज

ब्रम्हपुरी : भारतीय जनता पक्षाच्या वतीने दि. 6 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत सामाजिक न्याय सप्ताह मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने भाजयुमो ब्रह्मपुरी तालुक्याच्या वतीने आज, दिनांक 7 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वा. प्राथमिक आरोग्य केंद्र गांगलवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सर्व दानात रक्तदान हे श्रेष्ठ दान असून रक्तदानामुळे गरजू व्यक्तीला जीवदान मिळत असते. त्यामुळे रक्तदानाला पर्याय नाही. युवकांमध्ये रक्तदानाची भरपूर क्षमता असते. त्यामुळे युवकांनी रक्तदानासाठी समोर येऊन गरजू व्यक्तीला रक्त उपलब्ध होण्याकरिता रक्तदान करावे. यामुळे गरजू व्यक्तीचे नव्हे तर त्याच्या कुटुंबाचे जीवन धन्य होत असते. त्यामुळे युवकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे. तसेच आज होणाऱ्या भाजयुमोच्या स्तुत्य उपक्रमात, रक्तदान शिबिरात प्रत्यक्ष रक्तदान करून राष्ट्रकार्याच्या उभारणीस मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर यांनी केले आहे.