भाजपा स्थापनादिनी अहेरीत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वात वीर सावरकर गौरव यात्रा

44

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी : भारतीय जनता पार्टी स्थापना दिन ६ एप्रिलचे औचित्य साधून अहेरी शहरात माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली भाजपा अहेरी तालुकातर्फे मुख्य मार्गाने वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी अहेरी राजमहाल समोर भाजपाचा ध्वजाचे ध्वजारोहण राजे साहेबांच्या हस्ते करून अहेरी शहरात भव्य विर सावरकर गौरव यात्रेची सुरुवात करण्यात आली.

कांग्रेस नेते राहुल गांधी यांच्याद्वारे स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वारंवार चुकीची टिप्पणी करून त्यांचे मुद्दामहून अपमान करणे हे निषेधार्थ असून ह्यापुढे थोर महापुरुषांचे अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही. वीर सावरकर ह्यांनी देशासाठी केलेले त्याग जनता कदापी विसरू शकत नाही, असे प्रतिपादन ह्यावेळी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले. यावेळी अहेरी तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.