चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचा यंदाही उत्कृष्ट निकाल

41

– जीएनएम प्रथम वर्षाचा 90.62 टक्के निकाल

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडीकल एज्युकेशन मुंबई यांनी नुकताच नर्सिंग जीएनएम प्रथम वर्षाचा निकाल घोषित केला आहे. यात धानोरा तालुक्यातील चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचा यंदाही उत्कृष्ट निकाल लागला आहे.

जीएनएम प्रथम वर्षाच्या परीक्षेत या कॉलेजच्या 32 पैकी 29 विद्यार्थी उत्तीण झाले असून या निकालाची टक्केवारी 90.62 एवढी आहे. यंदा सुद्धा या कॉलेजने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

जीएनएम प्रथम वर्षाच्या निकालात शुभांगी गुरुदास गेडाम या विद्यार्थिनीने 389 गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. अंजली सुरेश चंदागडे हिने 382 गुण घेत द्वितीय तर साक्षी संजय गायकवाड हिने 381 गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे. आदिवासी, दुर्गम भागातील या महाविद्यालयातील विद्यार्थिनींंनी प्राप्त केलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींंनी आपल्या यशाचे श्रेय संस्थाध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे, प्राचार्य दिप्ती नादुरी, स्टुडंट नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा निकिता सडमेक, कार्यालयीन कर्मचारी अनिल मेश्राम, गुरुदेव सेडमाके यांना दिले आहे.