गडचिरोली जिल्हा न्यायालयीन बेलिफ संघटनेची बिनविरोध निवड

65

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा न्यायालयीन बेलिफ संघटनेची वार्षिक आमसभा २६ मार्च २०२३ रोजी गडचिरोली येथील विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य बेलिफ महासंघाचे उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा बेलिफ संघटनेचे अध्यक्ष आर. एस. गौरकर यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेचे ज्येष्ठ सभासद बी. डी. वासेकर, एम. एल. रूयारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी आमसभेत गडचिरोली जिल्हा न्यायालयीन बेलिफ संघटनेची कार्यकारीणी बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष म्हणून आर. एस. गौरकर, सचिव आर. टी. फुकटे, उपाध्यक्ष ए. डी. मूून, कोषाध्यक्ष एस. एल. दुर्गम, सहसचिव एन. एल. टिंगुसले, संघटक आर. आर. दरडे, आँडीटर व्ही. एस. सोरते, सल्लागार आर. एम. पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आमसभेला बि. के. खोब्रागडे, बि. डब्ल्यू. कोरडे, ए. व्ही. माणुसमारे, ए. बि. कोंडावार, टी. एल. घुगलोत, एस. डी. चलाख आदी सभासदांची उपस्थिती होती. यावेळी संचालन बि. के. खोब्रागडे यांनी तर आभारप्रदर्शन ए. डी. मून यांनी केले.