राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपातर्फे अहेरी येथे उद्या तीव्र निदर्शने

50

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी चोर है असे सार्वजनिक सभेत म्हणून समस्त OBC समाजाची तथा देशाच्या प्रधानमंत्री यांची बदनामी केले होते. त्यावर सुरत जिल्हा न्यायालयाने शिक्कामोर्तब करीत राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा नुकतीच सुनावली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांची खासदारकी ही आज रद्द केली आहे.

बहुसंख्य ओबीसी समाजाची बदनामी करून त्यांची भावना दुखावनाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भाजपा अहेरी तालुका तर्फे अहेरी येतील मुख्य चौकात उद्या, 24 मार्च रोजी दुपारी 12 वाजता तीव्र निदर्शने करून जाहीर निषेध केले जाणार आहे. यात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री यांनी केले आहे.