कॅन्सरग्रस्त महिलेला माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत

42

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 

अहेरी शहरातील मोगलीवार बेघर कॉलनीत राहणाऱ्या ज्योती मोगलीवार ही महिला कॅन्सर या दुर्धर आजराने ग्रस्त असल्याचे आणि त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्यांना पुढील औषधोपचार करने जड जात होते. या महिलेच्या प्रकृतीची माहिती येथील कार्यकर्त्यांकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच त्यांनी कॅन्सरग्रस्त महिला ज्योती मोगलीवार यांना औषधोपचाराकरिता आर्थिक मदत केली. ज्योती मोगलीवार मागील काही दिवसांपासून कॅन्सर या आजाराने पिडीत आहेत.घरची आर्थिक स्थिती खूपच बिकट असल्याने या दुर्धर आजारावरील महागडे औषधउपचार करणे त्यांना आवश्यक होते.

कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक मदत करताना नगर पंचयातचे उपाध्यक्ष शैलेशभाऊ पटवर्धन, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, शंकर दंडिकवार, आदित्य पुसालवार, विनोद रामटेके, नरेंद्र गर्गम, प्रकाश दुर्गे आदी उपस्थित होते.