दिल्ली येथील भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाच्या आढावा व नियोजन बैठकीला खा. अशोकजी नेते यांची उपस्थिती

37

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दिल्ली प्रदेश कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाची आढावा व नियोजन बैठक भाजपाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस श्री. बी. एल. संतोषजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मोर्चाचे राष्ट्रीय संघटक व्ही. सतिशजी, मोर्चाचे अध्यक्ष श्री. समीर ओरावजी (राज्यसभा खासदार), मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिलीप शैकिया यांच्या मार्गदर्शनात पार पडली. या बैठकीला खासदार तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनुसुचित जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी उपस्थिती दर्शवून अनु. जनजाती मोर्चाच्या संघटनेविषयी मार्गदर्शन केले.

गुढीपाडव्याच्या सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत या आढावा व नियोजन बैठकीची सुरुवात केली. या बैठकीत अनु. जनजाती मोर्चाच्या विविध क्षेत्रातील समस्या व सविस्तरपणे विस्तारित विविध विषयांवर चर्चा करून बैठक घेण्यात आली.

या बैठकीत आदरणीय श्री  जे. पी. नड्डा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपा, भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस आदरणीय श्री. बी. एल. संतोषजी, मोर्चाचे राष्ट्रीय संघटक आदरणीय श्री. व्ही. सतीशजी, खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार व मोर्चा प्रभारी श्री. दिलीप शैकिया, आदरणीय श्री. महेंद्र पांडे, केंद्रीय कार्यालय मंत्री, भाजपा तसेच बैठकीला राष्ट्रीय पदाधिकारी, राज्यांचे प्रभारी व प्रदेशाध्यक्षांची उपस्थिती होती.