– जिमलगट्टा येथे 445.93 लाखांच्या निधीतून होणार बांधकाम, दर्जेदार बांधकाम करण्याचे निर्देश
विदर्भ क्रांती न्यूज
अहेरी : तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा जिमलगट्टा येथे मुलांचे वसतिगृह इमारतीचे बांधकाम होणार असून नुकतेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रेमानाथ लोखंडे, प्रकाश जामठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्षण येर्रावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार, जिमलगट्टाचे सरपंच पंकज तलांडे, उपसरपंच वेंकटेश मेडी, पोलीस पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरी अंतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रम शाळा जिमलगट्टा येथे निवासाची अपुरी सुविधा असल्याने मागील काही दिवसांपासून मुलांसाठी वसतिगृह इमारत बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली होती. आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नातून आदिवासी विकास विभागाने त्वरित निधी मंजूर केले असून नुकतेच यांच्याहस्ते जिमलगट्टा येथे वसतीगृह इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
तब्बल 445.93 लाख रुपयांच्या निधीतून वसतिगृह इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे.नूतन इमारत मिळाल्याने शाळेतील मुलांना निवासाची उत्तम सुविधा होणार आहे.मात्र, विद्यार्थी निवासी स्वरूपात राहणार असल्याने दर्जेदार बांधकाम करण्याचे निर्देश आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले.