चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करा

33

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांची विधानसभेत मागणी

– जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे व कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा उचलला मुद्दा

– धान शेतकऱ्यांसाठी प्रत्येक तालुक्यात किमान १ गोडाऊन बांधण्याची केली मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करावे अशी मागणी सातत्याने होत असून यासाठी मागील शासनाच्या काळात हुडकू बँकेने प्रस्तावित केलेल्या निधीवरील स्थगिती तातडीने उपलब्ध उठवून तो निधी उपलब्ध करून द्यावा व चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करावे अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आज विधानसभेत केली.

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आरोग्य संबंधित विविध विषयांचा मुद्दा विधानसभेत उचलला. प्राथमिक आरोग्य केंद्र लखमापूर बोरी येथे उद्घाटन होऊनही पद मान्यता नसल्याने आरोग्य केंद्र सुरू होऊ शकले नाही त्यामुळे तेथील पद मान्यता तात्काळ देण्यात यावी अशी मागणी केली. प्रत्येक आरोग्य केंद्रात गट “अ” चे २ वैद्यकीय अधिकारी तर गट “ब” चा किमान १ वैद्यकीय अधिकारी देण्यात यावा अशी विनंती त्यांनी सभागृहाला केली. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गट “अ” व “ब” ची वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून ती तातडीने भरण्यात यावी अशी ही विनंती केली. गोरगरिबांसाठी आरोग्यासाठी असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ केवळ सरकारी रुग्णालयातून दिला जातो तो लाभ गडचिरोली जिल्ह्यात असणाऱ्या डॉक्टर बंग व डॉक्टर आमटे यांच्यासारख्या अन्य मोठ्या दवाखान्यांमध्ये सुद्धा देण्यात यावा अशी विनंती त्यांनी सभागृहाला केली. आरोग्य केंद्रात असणाऱ्या पीटीए अंशकालीन मदतनीस कर्मचाऱ्यांना किमान २ हजार ५०० रुपयांचे मानधन वाढवून देण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. एएनएम व जी एन एम चे अपग्रेडेटेशन करावे ,जिल्ह्यात फार्मासिटिकल कॉलेजला मंजूर देण्यात यावी, तसेच प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांसाठी किमान १ गोडाऊन तयार करण्यात यावा. ग्रामपंचायती मधील डाटा एन्ट्री ऑपरेटरवर रोजगार सेवकांचे मानधन वाढविण्यात यावे, अशी विनंतीही त्यांनी यावेळी सभागृहाला केली.