शिक्षणाला श्रमाची जोड देणे आवश्यक : कादंबरीकार राजन गवस

89

– दंडकारण्य संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाचा समारोप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सध्याच्या परिस्थितीत शेतात राबण्यासाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत तर दुसरीकडे युवावर्ग रिकामा फिरताना दिसत आहे. कारण आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती अशी स्थिती समाजात बघायला मिळत आहे. शिक्षणातून श्रम ही गोष्ट हद्दपार केली ही सर्वात मोठी चूक आहे. त्याकरिता शिक्षणाला श्रमाची जोड देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कादंबरीकार व विचारवंत राजन गवस यांनी केले.
दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेचा सुवर्ण महोत्सव वर्ष सांगता समारोप स्थानिक विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रभूषण व पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. अभय बंग होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत रंगनाथ पठारे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, सहकार महर्षी बाबासाहेब वासाडे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, सचिव प्रा. डाॅ. प्रमोद मुनघाटे, उपाध्यक्ष देवाजी पाटील नरुले, सदस्य पांडुरंग पाटील म्हशाखेत्री, प्रा. अरविंद बंदे, सुग्रीव दुधमोचन, नामदेव बानबले, डॉ. सुरेश लडके, सौरभ मुनघाटे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘दंडकारण्य वृक्ष कांचन’ या स्मरणिकेचे तसेच नंदकुमार मोरे संपादित ‘शोध काटेमुंडरीचा’ यांचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सचिव डॉ. प्रमोद मुनघाटे, संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर तर आभार प्रदर्शन डॉ. रवींद्र विखार यांनी केले. कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, सुमती लांडे, डॉ. सतीश गोगुलवार, संगीडवार, संदीप गड्डमवार, प्राचार्य भाऊसाहेब जगनाडे, डॉ. एन. एस. कोकोडे, अॅड. गोविंद भेंडारकर, प्राचार्य हिराजी बनपूरकर, प्राचार्य डॉ. बुटे, मुख्याध्यापिका वंदना मुनघाटे, घटक संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.