शिवसैनिकांनो ; गावागावात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटन मजबूत करा

67

– गडचिरोली जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांचे आवाहन

– गडचिरोली जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब-मुरमाडी जि.प. क्षेत्रातील शेकडॊ शिवसैनिक एकवटले

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेची विचारधारा घराघरापर्यंत पोहचवून शिवसेनेची ताकद अधिक वाढविण्यासाठी आता मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्या शिवसेनेचे गावागावात जाऊन संघटन मजबूत करावयाचे आहे. ‘‘गाव तिथे शाखा, हर घर शिवसैनिक’’ निर्माण करायचे असून त्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने काम करावे, असे प्रतिपादन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांनी केले.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका लक्षात ठेवून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि ग्रामपंचायत स्तरावर बुथ मजबुुतीकरण शिवसेना संकल्पना अभियाना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील गट प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, बुथ प्रमुख, बीएलए नियुक्ती अभियान राबविण्यात आले. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पोतदार बोलत होते.
गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात राबविण्यात आलेल्या शिवसेना संकल्पना अभियानानिमित्याने शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिक एकवटले आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविणारच असा निर्धार सुध्दा शिवसैनिकांनी यावेळी केला.
यावेळी मार्गदर्शन करतांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले की, हिंदु हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेले शिवसेना ही गोरगरीबांच्या कल्याणासाठी झटणारी शिवसेना आहे. मा. बाळासाहेबांची विचारधारा जोपासून मा. उध्दव साहेबांची शिवसेना काम करीत आहे. आम्ही मा. बाळासाहेबांच्या खऱ्याखुऱ्या शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आहोत. खरी शिवसेना कोणती हे जनतेला माहित आहे. गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात शिवसैनिकांची मोठी फळी निर्माण झाली आहे. आम्ही आतापर्यंत या क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे आणि जनतेच्या सहकार्यामुळे या क्षेत्रात शिवसेनेची ताकद वाढली असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत विजयाची पताका फडकिवणारच आणि यासाठी शिवसैनिकांनी तत्पर राहावे, असे प्रतिपादन अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.
शिवसेनेच्या संकल्प अभियानाप्रसंगी ग्राम पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांना शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार, गडचिरोली विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी झोरे, जिल्हा सहपंर्कप्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, विलास कोडाप गडचिरोली विधानसभा जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील उपतालुका प्रमुख यादवजी लोहंबरे, विभाग प्रमुख अमित बानबले, उपविभाग प्रमुख संदिप आलबनकर, सरपंच सुरज उईके, नवनाथ उके, संजय बोबाटे, दिपक लाडे, नरेश कुकडकार, स्वप्निल खांडरे, अंबदास मुनघाटे, त्र्यंबक फुलझेले, प्रशांत ठाकुर, भाऊराव नन्नावरे, रत्नाकर रंधये, संदिप टेंभुर्णे, उमाजी चनेकार, वसंत आभारे, रमेश सिडाम, देवीदास चनेकार, मयुर भोयर, महेश लाजुरकर, अंकुश झाडे, पंकज चनेकार, खुशाल मेश्राम, प्रांजल कोलते, पराग कुमरे, उमाजी लाजुरकर, पुरुषोत्तम चनेकार, दुर्वेश मुनघाटे, सुभाष देशमुख, रुपेश आजबले, भाऊराव मुनघाटे, गुरुदेव गोहणे, कुणाल पेंदाम, दिलीप वेलादी, निकेश मडावी, अमर निंबोड, अमित हुलके, राहुल मडावी, भक्तदास खेवले, सुरज टेकाम, गुरुदेव सेलोटे, कवडूजी धंदरे, गणेश खेवले, सचिन भरणे, कैलास फुलझेले, वामन भरणे, रमेश आवारी, उमाकांत हर्षे, धनवान लडके, हरिदास हर्षे, धनंजय खेडेकर, हिरामण कोसमशिले, रवि हर्षे, सोनुजी सिडाम, नितू हर्षे, विजय भरणे, एकनाथ हर्षे, मोरेश्वर शेरकी, सुरज ठुसे, मोतीराम उंदिरवाडे, श्रेयस भानारकर, शिवसान बुरेवार, गजानन सिडाम, अधीन शेख, दिनेश नन्नावरे, बालाजी वाकडे, गोपाल हजारे, सिद्धार्थ सोरते, गोकुळ नागापूरे, बालाजी बाबनवाडे, ताराचंद चुधरी, चेतन नागरे, खुशाल ढोलणे, सौरव कुरुडकार, राजु जवादे, विनायक कुरुडकार, अजय ठाकरे, मोहन करकाडे, आशिष ठाकरे, करण मुरतेली, उत्तम ठाकरे, निलेश ठाकरे, देवेंद्र मुरतेली, गणेश ठाकरे, आकाश मुंडरे यासह शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.