माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आलापल्लीचे उपवनसंरक्षक टोलीया यांच्याशी केली चर्चा

57

– एक वर्षापासून सुरू असलेल्या अहेरी – खमनचेरू रोडचे काम अडविले वनविभागाने

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ७ जानेवारी २०२३ : अहेरी तालुक्यातील ग्रा. पं. खमनचेरु ते अहेरी तालुक्याला जोडणारा एकमेव मुख्य मार्ग आहे. Cmgsy च्या अधिकाऱ्यांनी या रोडचे काम सुरु करून जनतेची मागणी पूर्ण करायला तयार असताना वनविभागाचे काही कर्मचारी यांनी या कामात आडकाटी टाकून रोखूून धरले. त्यामुळे अहेरी येथील माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांंनी वन अधिकारी DFO टोलिया यांना याबाबत विचारणा केली. अहेरी – खमनचेरू रोडचा काही भाग वनविभागाच्या अखत्यारित येत असल्याने वन विभागाने काम रोखले, अशी चर्चा अहेरी व खमनचेरू गावात सुरु आहे. जे रोड मागील पन्नास वर्षांपासून असून अचानकपणे वन विभागाच्या अखत्यारित कसे काय? आले असा प्रश्न जनता करीत आहे. जेव्हा विकास काम होणार असते तेव्हा वनविभाग विकास रोखून धरतात. हे मात्र समजण्या पलीकडचे आहे. जनताही वेळोवेळी वनविभागाला मदत करत असते. मात्र वन विभाग मात्र जनतेचे काम होऊ देत नाही ही मात्र चिंतेची बाब आहे. लवकरच अहेरी – खमनचेरूचे काम सुरू होणार असून माजी जि. प. अध्यक्ष अजय ककडालवार यांंच्या प्रयत्नांंना यश आले आहे.

यावेळी सुनीता कुसनाके माजी जि. प. सदस्य, अहेरी नगर पंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, विलास सिडाम नगरपंचायत सदस्य, विलास गलबले नगरपंचायत सदस्य,.शायलू मडावी सरपंच खमनचेरु, वंदना दुर्गे सदस्य महागाव व इतर कार्यकर्ते आलापल्ली वनविभागाच्या कार्यलयात जाऊन DFO टोलिया यांच्यासोबत चर्चा करून अहेरी – खमनचेरू रोडचे काम बंद असल्याबाबत चर्चा करून रोडचे काम तत्काळ काम सुरु करण्याकरिता बोलनी केले. त्यावेळी dfo टोलिया यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सूचना केली व कोणत्याही प्रकारचे काम बंद पाडू नये, अशी सूचना करून रोडचे काम सुरु करण्याचे तोंडी आदेश rfo ना दिले.