अजय कंकडालवार यांच्या हस्ते नागेपल्ली येथील कब्रस्थानाच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन

68

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ७ जानेवारी २०२३ : अहेरी तालुक्यातील नागेपली येथे मुस्लिम समाजाच्या कब्रस्थान असून सदर कब्रस्थानाला संरक्षण भिंतीच्या आवश्यकता होती. मुस्लिम समाजबांधवानी जि. प. अध्यक्ष श्री. अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली असता मागणीची दखल घेवून जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिले असून येत्या काही दिवसांत संरक्षण भिंतीचे बांधकाम पूर्ण होईल. आज जि. प. माजी अध्यक्ष श्री. अजय कंकडालवार यांच्या हस्ते सदर संरक्षण भिंतीच्या बांधकामाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला. या भूमिपूजनाला गावातील नागरिक उपस्थित होते. सुनीता कुसनाके माजी जि. प. सदस्य, लक्ष्मण कोडापे, सरपंच रमेश शांगोंडावार उपसरपंच, आशीष पाटील सदस्य, ममता मडावी सदस्य फेलिक्स गीध सदस्य, मल्लारेडी येमनुरवार सदस्य, संतोष अग्रवाल, किशोर दुर्गे, लोमेश वाळके सचिव, मकसुद पठाण, सदर मस्जिद, जमीर शेख, शाकीर शेख, इस्तारू पठाण, शेरखान पठाण, अली मिस्त्री, अनवाज भाई, मेहबूब पठाण, समशेर पठाण, हसन शेख, जुळेख शेख, अमजद भाई आदी गावकरी उपस्थित होते.