मन्नेराजाराम येथे नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना

73

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नक्षलीदृष्टया अतिसंवेदशील असलेला गडचिरोली जिल्हा, दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखिल विकासापासून कोसोदूर आहेत. त्यांचा विकास साधावा व नक्षल कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलिस दलाने दिनांक 4/1/2023 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत मन्ने राजाराम या ठिकाणी नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली.

सदर पोलिस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात 1000 मनुष्यबळ, 10 जेसीबी,10 ट्रेलर, 3 पोकलेन, 40 ट्रक इत्यादीच्या सहायाने अवघ्या एका दिवसात पोस्ट उभारणी करण्यात आली. पोस्टमध्ये वायफाय सुविधा, 20 पोर्टा कॅबिन, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल इत्यादींची उभारणी करण्यात आली. पोस्ट सुरक्षेसाठी गडचिरोली पोलिस दलाचे 3 अधिकारी व 46 अमलदार, एसआरपीफचे 2 अधिकारी व 50 अमलदार तसेच सीआरपीएफचे एकअसिस्टंट कमांडंट, 4 अधिकारी व 60 अमलदार तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोस्ट उभारणी कार्यक्रमात जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला त्यात मनन राजाराम येथील नागरिकांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.

सदर पोस्ट उभारणी कार्यक्रमात गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक श्री. संदीप पाटील, सीआरपीएफचे पोलिस उपमहानिरीक्षक श्री. लोकेंद्र सिंह, पोलिस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, सीआरपीएफ 9th बटालियनचे कमांडंट श्री. बाळापूरकर, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) श्री. यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, उपविभागीय पोलिस अधिकारी भामरागड श्री. नितीन गणापुरे व मन्नेराजारामचे नवनियुक्त प्रभारी श्री. उमेश कदम उपस्थित होते.