राणी दुर्गावती कन्या विद्यालयात विद्यार्थिनींना सायकल वितरण

42

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ७ जानेवारी २०२३ : मानव विकास मिशन अंतर्गत बाहेर गावावरून आवागमन करणार्‍या विद्यार्थिनींना मोफत सायकल वितरण करण्यात येते. या अंतर्गत स्थानिक राणी दुर्गावती कन्या विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून सत्र २०२२-२३ मध्ये मंजूर सायकलींचे वितरण नगर परिषदेचे निरीक्षक प्रतिक नाहारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्या वैशाली मडावी, पर्यवेक्षक पुरुषोत्तम ठाकरे, राणी दुर्गावती कन्या वसतीगृहाच्या अधिक्षिका वर्षा शेडमाके, ज्येष्ठ शिक्षक आर. बी. चुर्‍हे, जेष्ठ शिक्षिका जे. आर. राणे उपस्थित होते.चालू सत्र २०२२-२३ मध्ये एकूण १३ विद्यार्थीनींना सायकलींचा लाभ देण्यात आला. लाभार्थीमध्ये पायल बोबाटे, समिक्षा पिपरे, गायत्री भांडेकर, स्विटी चिचघरे, ममता मल्लेलवार, प्रेरणा कोसरे, अस्मिता कांबळे, माहेश्वरी मेश्राम, भूमिका साहू, बाली भोयर, संजना कोपुलवार, गुणगुण कोपुलवार व प्रांजली हलामी आदींचा समावेश आहे. विद्यार्थिनींना सायकली मिळाल्याने विद्यार्थिनींनी नियमित शाळेत यावे, असे आवाहन प्राचार्या वैशाली मडावी यांनी केले. यावेळी शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.