आजपासून हरांबा येथे ११ कुंडीय गायत्री महायज्ञ

107

– आज ग्रामसफाई, भव्य मंगल कलश यात्रा (लेझीम सोबतश व संगीत प्रवचन

विदर्भ क्रांती न्यूज

सावली, ७ जानेवारी २०२३ : अखिल भारतीय गायत्री परिवार हरांबा तथा समस्त गावकरी मंडळी हरांबा व उमरीच्या वतीने ७ ते ९ जानेवारी या कालावधीत तीन दिवसीय ११ कुंडीय गायत्री महायज्ञ, संगीत प्रवचन व दीप महायज्ञाचे आयोजन सावली तालुक्यातील हरांबा येथील जीवन विकास विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे.
या महायज्ञादरम्यान शनिवार, ७ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता ग्रामसफाई, दुपारी २ वाजता तिलमलनाथ मंदिर परिसरातून भव्य मंगल कलश यात्रा (लेझीम सोबत), सायंकाळी ५ वाजता संगीत प्रवचन होणार आहे.
रविवार, ८ जानेवारीला सकाळी ८ वाजता ११ कुंडीय गायत्री महायज्ञ, ११ वाजता वैनगंगाकाठ ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था हरांबाच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिर, सायंकाळी ५ वाजता संगीत प्रवचन व १००८ दीप महायज्ञ होईल. सोमवार, ९ जानेवारीला सकाळी ८ वाजता ११ कुंडीय गायत्री महायज्ञ, विविध संस्कार, पूर्णांहुती व निरोप समारंभ, दुपारी ३ वाजता महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय गायत्री परिवार हरांबा तथा समस्त गावकरी मंडळी हरांबा व उमरीच्या वतीने करण्यात आले आहे.