विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ६ जानेवारी २०२३ : मराठी पत्रकारितेचे जनक, थोर समाजसुधारक तथा लोकशिक्षणाचे आद्य प्रवर्तक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी रोजी १८३२ रोजी दर्पण नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून वृत्तपत्र सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हापासून ६ जानेवारी हा दिवस दर्पणकार यांची आठवण म्हणून हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डिजीटल मीडिया व वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असलेल्या गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन (गामा) च्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील विश्रामभवनात पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला गामाचे सदस्य तथा पुर्णसत्य न्यूज पोर्टलचे संपादक हेमंत डोर्लीकर, गडचिरोली वार्ताचे संपादक जयंत निमगडे, एव्हीबी न्यूजचे संपादक अनिल बोदलकर, गोंडवाना टाईम्सचे संपादक व्यंकटेश दुडमवार, महाभारत न्यूजचे संपादक उदय धकाते, राईट टाईम न्यूजचे संपादक राजू सहारे, विदर्भ क्रांती न्यूजचे संपादक मुक्तेश्वर म्हशाखेत्री, खबर जनता तक न्यूजच्या संपादक रुपाली शेरके आदी उपस्थित होते.