मैदानी खेळांमुळे शरीर निरोगी व सुदृढ राहते : अरविंदभाऊ कात्रटवार

62

– चांभार्डा येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २६ डिसेंबर २०२२ : कबड्डी हा ग्रामीण भागातील लोकप्रीय खेळ आहे. आता या खेळाने राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली असून मोठ्या स्पर्धांंचे आयोजन सुध्दा केले जाते. कबड्डी खेळामुळे संघातील खेळाडूंमध्ये एकमेकाबाबत सहकार्याची भावना निर्माण होऊन आपल्या सामर्थ्य व शक्तीचे दर्शन घडून येते. तसेच शरीर सुदृढ व निरोगी राहते. कठीण प्रसंगाला सामोरे जाऊन कठीण प्रसंगाचा धैर्याने सामना करण्याची प्रेरणा मिळते. असे प्रतिपादन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.

शिव स्वराज युवक क्रीडा मंडळ चांभार्डाच्या वतीने ग्रामीण भागातील खेळाडुंच्या क्रीडा विकासाला चालणा देण्यासाठी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी खेळाडुंना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
शिवसेना उध्दव बाळासाहेब पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, आजच्या युगात खेळाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. प्रत्येकांमध्ये कोणत्या ना कोणत्या खेळाप्रती आवड असते. ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा कौशल्य असतात. परंतू क्रीडा सुविधा व मार्गदर्शनाच्या अभावामुळे खेळाडू मागे पडतात. खेळामुळे आपले करिअर सुध्दा घडू शकते. त्यासाठी सतत मेहनत, जिद्द चिकाटीने काम करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील युवकांच्या क्रीडा विकासाला चालणा देण्यासाठी शासनाने क्रीडाधोरण निश्चित करून ग्रामस्तरावर क्रीडांगण निर्मिती व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील खेळाडुंनी तालुका आणि जिल्हास्तरावर आयोजीत केल्या जाणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन मिळालेल्या संधीचे सोने करावे आणि क्रीडा क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवावा, असेही अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले. याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, संदिप आलबनकर उपसरपंच चाभार्डा, किशोरजी किरंगे ग्रामसेवक इंदाराम, मधुकरजी हलामी, सौ. अश्विनी मेश्राम, सौ. शुभांगी आत्राम, श्री. दुधराम चनेकर, विलास ठाकरे, जगदीश बावणे, मुकरूजी चनेकार, सुरेश ठाकरे, मोरेश्वर हलामी, मनोहर लाजुरकर, लोमेश उरकुडे, प्रतीक मेश्राम, मयूर भोयर, तरुण म्हस्के, प्रज्वल कोलते, खुशाल मेश्राम, धनंजय चापले, सुरेश कोलते, पंकज चणेकार, महेश लाजुरकर, प्रफुल किरांगे, गौरव पाल यासह चांंभार्डा येथील शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.