राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वात अहेरी विधानसभा क्षेत्रातील 4 ग्रामपंचायतीत भाजपाचा दणदणीत विजय

74

– किष्टापूर दौड, तोडसा, बेज्जूरपल्ली आणि मादारम येथे भाजपाच्या सरपंच आणि सदस्यांचा विजय

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २६ डिसेंबर २०२२ : अहेरी विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली लडविलेल्या 7 पैकी 4 ग्रामपंचायतीत भाजपा पैनलचा दणदणीत विजय झाला आहे. ह्या सर्व ग्रामपंचायतीत राजेंनी झंझावाती प्रचार दौरा केला होता.
अहेरी तालुक्यातील किष्टापूर दौड येथे सरपंचपदी अमृता तोरेम यांच्यासह 4 सदस्य, एटापल्ली तालुक्यातील तोडसा येथे सरपंचपदी वनिता कोरामी सह 5 सदस्य, तसेच सिरोंचा तालुक्यातील बेज्जूपल्ली येथे सरपंचपदी इप्पो मडे सह 3 सदस्य आणि मादारम ह्या ठिकाणी 9 पैकी 6 सदस्य भाजपाचे निवडून आल्याने अहेरी विधानसभा क्षेत्रातील 4 ग्रामपंचायतीत भारतीय जनता पार्टी पॅनलने दणदणीत विजय प्राप्त करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राजमहाल अहेरी येथे सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचे राजे साहेबांनी पुष्पहार घालून त्यांना मिठाई देत सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.