भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

46

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २४ डिसेंबर २०२२ : 

भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चा महामंत्री श्री. मधुकर केशव भांडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी गडचिरोली यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महामंत्री मधुकर भांडेकर यांनी रामपूर टोली (तालुका चामोर्शी) या गावातील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन या गावची अतिक्रमणाची तक्रार असल्यामुळे विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याबाबतची तक्रार माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. हे गाव गेल्या साठ वर्षांंपासून वसलेले असून या गावांमध्ये विविध विकासकामे झालेली आहेत. परंतु एका तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या तक्रारीमुळे त्या गावातील घरकुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. घरकुलांच्या झालेल्या कामांचे देयके प्रलंबित आहे. हा विषय गंभीर असून या विषयावर योग्य तो निर्णय घेऊन गावातील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन गरीब लोकांच्या घरकुल बांधकामाचा विषय लवकरात लवकर मार्ग काढण्यात यावा, अशी विनंती गावकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांंकडे निवेेेदनातून करण्यात आली.

यावेळी उपस्थित प्रल्हाद दादाजी सातपुते, वासुदेव फकीरा शेटे, संजय सुरेश चलाख, रामदास बाबाजी पिपरे, दिलीप शामराव गव्हारे, एकनाथ देवाजी कुंभारकर, वसंत महादेव मडावी, चंदू देवाजी गवारे, गणेश गुरुदेव पिपरे, केशव परसराम जुवारे, मंगरूळ बुद्धाची बोधलकर, सुरेश चलाख, सहादेव पिपरे, पुनाजी पिपरे, नितीन चलाख, विठ्ठल गवारे, प्रमोद गव्हारे, मुकुंदा चलाख, साईनाथ चलाख, सुरेश चलाख, कालिदास बोदलकर, संतोष कुनघाडकर, डोमदेव कुनघाडकर, बंडू दुधबळे, काशिनाथ किरमे, पुरुषोत्तम बोदलकर, मंगरू बोदलकर, रवींद्र जुवारे, लोमेश गेडाम, पांडुरंग मेश्राम, गुरुदेव बारसागडे, अनिल बोदलकर व गावातील नागरिक उपस्थित होते.